जननी सुरक्षा योजना (JSY)

  • उद्देशः
    • माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
    • महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे.
  • लाभार्थीः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला
  • लाभाचे स्वरूपः
    • बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये.
    • बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकीत आरोग्य केंद्रात झाल्यास
      • शहरी भागात -रु. 600/-
      • ग्रामीण भागात – रु. 700/-
      • सिझर झाल्यास रु. 1500/-
    • सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर डी.बी.टी., पी.एफ.एम.एस.द्वारे देण्यात येतो.
  • आवश्यक कागदपत्रेः
    • MCP कार्ड आणि RCH नंबर
    • बाळंत महिलेचे बँक पासबुक
  • माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
    • आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
    • जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
    • 104 या हेल्पलाईनवर फोन करा.