राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5% अबंध निधी थेट देण्याबाबत

ग्रामपंचायत  विभाग योजनेचे स्वरुप
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5% अबंध निधी थेट देण्याबाबत –

 

·      निधीचा वापर ठरविण्याचे स्वतंत्र अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेले आहे. यासाठी ग्रामसभेने अबंध निधीचा वार्षिक नियोजन आराखडा तयार करावयाचा असून ग्रामसभेमध्ये मान्यता घ्यायची आहे. आराखडा तयार करताना ग्राम पंचायतीच्या क्षेत्रामध्ये येणा-या प्रत्येक गावातील / पाडयातील लोकांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामसभेमध्ये सर्वाच्या सहमतीने ग्रामपंचायतीचा आराखडा एकत्रित करावयाचा आहे.

·         या निधीतून गावाचा संपुर्ण विकास करण्यासाठी प्रामुख्याने खालील चार प्रकारची कामे करावयाची आहेत.

अ)   पायाभूत  सुविधा

1.     संबंधित पेसा गावातील  ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे, अंगणवाडया, शाळा, दफनभुमी, गोडावून, गावाचे अंतर्गत रस्ते व तत्सम पायाभूत सुविधा.

वन हक्क अधिनियम व पेसा कायद्याची

     अंमलबजावणी

1.आदिवासींची  त्यांच्या उदरनिर्वाहाच्या

 व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण/मार्गदर्शन करणे.

2.गावतळी विकास किंवा मत्स्यपालन व्यवसाय/ मत्स्यबीज  खरेदी करणे.

3. सामाईक जमिनी विकसित करून देणे.

4. गौण पाणी साठयाचे व्यवस्थापन.

5. सामाईक नैसर्ग‍िक साधनसंपदा व सामाईक मालमत्ता विकसित करणे.

आरोग्यस्वच्छताशिक्षण

1. सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे

2.गावामध्ये स्वच्छता राखणे.

3.सांडपाणी व्यवस्थेकरीता गटारे बांधणे व त्याची देखभाल  करणे.

4.शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे.

 डवनीकरणवन्यजीव संवर्धन, जलसंधारण,वनतळी,वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका.

 

  

ग्रामसभांनी कामाची निवड करणे म्हणजेच त्या कामास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता समजावी. ग्रामसभेने निवड केलेल्या रु.3 लक्ष पेक्षा कमी मुल्याच्या कामास स्वतंत्र तांत्रिक मान्यता आवश्यक असणार नाही व रु.3 लक्ष पेक्षा अधिक मुल्य असलेल्या कामासाठी तांत्रिक मान्यता घेण्याची पध्दती परिच्छेद-4(6) प्रमाणे राहील.

*तसेच पेसा 5 % निधी ब व ड वरील खर्च करणे संदर्भात आदिवासी विभागाकडील दिनांक 20/02/2016 शासन निर्णया नुसार शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

वन हक्क मान्यता अधिनियम 2006 च्या नियम 2008च्या नियम 4(1)(e) नुसार समिती स्थापन पालघर जिल्हयात 822 गावांसाठी समित्या स्थापण करण्यात आलेल्या आहेत.