जी.आर. आर (आबा) पाटील सुंबर गाव पुरस्कार योजना

ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१.११.२०१६ च्या निकषानुसार पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांना आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना अंतर्गत तालुका सुंदर गाव म्हणून निवड केलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी रुपये दहा लाख पुरस्काराची रक्कम अदा केली जाते. तसेच निवड केलेल्या तालुका सुंदर मधून जिल्हा सुंदर गावाची निवड करण्यात येते, जिल्हा सुंदर गाव म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींना रुपये चाळीस लाख पुरस्काराची रक्कम अदा करण्यात येते.

सन २०१६-१७ ते २०१९-२० पर्यंत प्रतीवर्षी आठ ग्रामपंचायतींना तालुका सुंदर गाव म्हणून निवड करून त्यांना पुरस्काराची रक्कम अदा करण्यात आली आहे. तसेच, सन २०१६-१७ ते २०१८-१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती व सन २०१९-२० मध्ये दोन ग्रामपंचायतींना विभागून जिल्हा सुंदर गाव म्हणून निवड करून पुरस्काराची रक्कम अदा करण्यात आली आहे.

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१.११.२०१६ च्या निकषानुसार विविध कामे करण्यात आली आहेत.