ऐतिहासिक

जय विलास पॅलेस

जय विलास पॅलेस , ज्याला राजबारी असेही म्हणतात , हे महाराष्ट्रातील जव्हारमधील सर्वात प्रमुख ऐतिहासिक ठिकाण आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला राजा यशवंत राव मुकणे यांनी बांधलेले हे मंदिर जव्हार संस्थानातील मुकणे शासकांसाठी शाही निवासस्थान म्हणून काम करत असे . सायनाइट दगडापासून बांधलेला हा राजवाडा पाश्चात्य आणि भारतीय स्थापत्य शैलींचे मिश्रण करतो आणि गुलाबी दगडाच्या दर्शनी भागासाठी ओळखला जातो. ते एका टेकडीवर वसलेले आहे, जे विहंगम दृश्ये देते आणि हिरव्यागार बागांनी वेढलेले आहे.

प्रमुख ऐतिहासिक पैलू:

  • मुकणे राजवंश:
    हा राजवाडा मुकणे राजवंशाच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा आहे, ज्यांनी शतकानुशतके जव्हारवर राज्य केले.  
  • स्थापत्य शैली:
    हे भारतीय प्रभावांसह नवशास्त्रीय वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते, ज्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि गुलाबी दगडी दर्शनी भाग आहे.  
  • ऐतिहासिक महत्त्व:
    ते राजेशाही निवासस्थान म्हणून काम करत होते आणि शासकांसाठी एक मोक्याचे स्थान होते, जे एक सोयीस्कर ठिकाण होते.  
  • चित्रीकरणाचे ठिकाण:
    या राजवाड्याच्या अद्वितीय वास्तुकलेमुळे ते चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.  

सध्याचा वापर:
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार , हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि ऐतिहासिक आकर्षणाचे ठिकाण आहे, जे त्याच्या वास्तुकला, उद्याने आणि इतिहासात रस असलेल्या पर्यटकांना आकर्षित करते. 

मुकणे राजघराणे

जव्हार संस्थानची स्थापना करणारे जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थान भारतात विलीन केले.

इतिहास

मुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले. [१][२]

जायबाजीरावच्या मुलाने म्हणजे, नेमशाह मुकणे यांनी तब्बल २२ किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज नेमशाह यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[३] त्यानंतर नेमशाहचा नातू महाराजा देवबारराव मुकणे यांनी बहामनी सल्तनतचे सुल्तान अहमदशहा (अल्लाउद्दीन) बहमानी विदारच्या किल्ल्यावर युद्ध केले. युद्ध कळताच ते बहामनी सल्तनतच्या राजकुमारीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करून जव्हारला परत आले.

मुकणे राजघराण्यातील शासनकर्ते

जव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे[४][५]

1)श्रीमंत जयबाजीराव मुकणे(इ.स.1316-1337)

2)श्रीमंत धुळाबाराव उर्फ नेमशाह मुकणे(इ.स.1337-1388)

3)श्रीमंत भीमराव उर्फ भीमशहा मुकणे(इ.स.1388-1429)

4)श्रीमंत देवबाराव उर्फ महंमदशहा मुकणे(इ.स.1429-1492)

5)श्रीमंत कृष्णाराव मुकणे प्रथम(इ.स.1492-1560)

6)श्रीमंत नेमशाह मुकणे द्वितीय(इ.स.1560-1630)

7)श्रीमंत विक्रमशाह मुकणे प्रथम(इ.स.1630-1678)

8)श्रीमंत पतंगशाह मुकणे प्रथम(इ.स.1678-1694)

9)श्रीमंत कृष्णशहा मुकणे द्वितीय(इ.स.1694-1710)

10)श्रीमंत विक्रमशहा मुकणे द्वितीय(इ.स.1710-1742)

11)श्रीमंत कृष्णशहा मुकणे तृतीय(इ.स.1742-1758)

12)श्रीमंत गंगाधरराव उर्फ पतंगशहा द्वितीय(इ.स.1758-1798)

13)श्रीमंत मालोजीराव उर्फ विक्रमशहा तृतीय(इ.स.1798-1821)

14)श्रीमंत हनुमंतराव उर्फ पतंगशाह तृतीय(इ.स.1821-1865)

15)श्रीमंत नारायणराव उर्फ माधवराव उर्फ विक्रमशहा चतुर्थ(इ.स.1865-1865)

16)श्रीमंत मल्हारराव उर्फ पतंगशहा चतुर्थ(इ.स.1865-1905)

17)श्रीमंत गणपतराव उर्फ कृष्णशहा चतुर्थ(इ.स.1905-1917)

18)श्रीमंत मार्तंडराव उर्फ विक्रमशहा पंचम(इ.स.1918-1927)

19)श्रीमंत यशवंतराव मार्तंडराव मुकणे उर्फ पतंगशहा सहावे (इ.स.1927-1978)

20)श्रीमंत दिग्विजयसिंहराजे मुकणे (इ.स.1978-1992)

21)श्रीमंत महेंद्रसिंहराजे मुकणे (इ.स1992)……….

शिरपामाळ

शिरपा माळ हे भारतातील महाराष्ट्रातील जव्हार शहराजवळील धरमपूर पाड्यामधील जव्हार नाशिक रोडवरील एक पर्यटन स्थळ आहे. 

शिवाजी महाराजांनी मराठा सैन्यासह सुरतला कूच केले. त्यांनी जव्हारच्या संस्थानाजवळ तळ ठोकला आणि जव्हारचे कोळी शासक विक्रमशाह मुकणे यांना भेटले.  त्यांनी एकत्रितपणे सुरतवर आक्रमण केले. शिरपा माळ हे छत्रपती शिवाजी महाराज आणि विक्रमशाह यांचे भेटीचे ठिकाण होते आणि तेव्हापासून ते एक ऐतिहासिक स्मारक बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३१ डिसेंबर १६६४ रोजी जव्हार येथे शिरपा माळला भेट दिली. १ मे १९९५ रोजी जव्हार नगरपरिषदेचे अध्यक्ष राजाराम मुकणे यांनी या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले.

शिरपामाळ
शिरपामाळ1
शिरपामाळ2
शिरपामाळ3

विजय स्तंभ ,जव्हार

जव्हारचा विजय स्तंभ (Vijay Stambh in Jawhar) हा जव्हार शहरातील एक महत्वाचा ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ आहे. हा स्तंभ जव्हारच्या इतिहासाची साक्ष देतो. 

जव्हारचा विजय स्तंभ ➖

  • ऐतिहासिक महत्त्व:

जव्हार संस्थानच्या इतिहासातील एक महत्वाचा भाग म्हणजे विजय स्तंभ. हा स्तंभ मुकणे घराण्याच्या शासकांनी बांधला.

  • बांधकाम:

हा स्तंभ मजबूत आणि सुंदर बांधणीचा आहे. त्याच्या बांधकामात स्थानिक स्थापत्यशास्त्राचा वापर करण्यात आला आहे.

  • प्रेक्षणीय स्थळ:

विजय स्तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. त्याच्याजवळचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे.

विजय स्तंभ ,जव्हार
भूपतगड किल्ला

भूपतगड किल्ला

     भूपतगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या जव्हार जवळचा एक किल्ला आहे. हा किल्ला जव्हारपासून १६ किलोमीटर अंतरावर आहे. भूपतगडाची निर्मिती ही त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली असावी.

  •       भूपतगड किल्ला हा जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याने खूप काळ राजवैभव पाहिले आहे. जव्हार संस्थान हे ठाणे जिल्ह्यात असून तेथे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे.
  •       जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार येथील एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे ‘सीतेची पावले’ म्हणतात.
  •       सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे.
  •       भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.
  •       हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham’s groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते.
भूपतगड किल्ला2