मुकणे राजघराणे
जव्हार संस्थानची स्थापना करणारे जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थान भारतात विलीन केले.
इतिहास
मुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले.
जायबाजीरावच्या मुलाने म्हणजे, नेमशाह मुकणे यांनी तब्बल २२ किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज नेमशाह यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[३] त्यानंतर नेमशाहचा नातू महाराजा देवबारराव मुकणे यांनी बहामनी सल्तनतचे सुल्तान अहमदशहा (अल्लाउद्दीन) बहमानी विदारच्या किल्ल्यावर युद्ध केले. युद्ध कळताच ते बहामनी सल्तनतच्या राजकुमारीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करून जव्हारला परत आले.
मुकणे राजघराण्यातील शासनकर्ते
जव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे